पिंपरी (Pclive7.com):- संविधान जागर अभियानांतर्गत संविधान दिनानिमित्त व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन. या संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान व त्यातील मुलतत्वे घराघरात पोहोचावी. ती सर्वसामान्यांनाही माहिती असावी या उद्देशाने अॅड. किरण शिंदे यांनी संविधान जागर अभियान सुरू केले आहे.
भारतीय संविधानाचा सरनामा हा घटनेचा आत्मा व सार आहे. म्हणून तो लोकांनी समजून घ्यावा यासाठी संविधान जागर अभियाना अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत भारतीय संविधानाचा सरनामाचा अर्थ व महत्त्व अधोरेखित करणारा तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवण्याचा आहे. व तो व्हाट्सअप च्या माध्यमातून खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे. असे स्पर्धेचे स्वरूप आहे. सदरचा व्हिडिओ तयार करून तो दि.०५ डिसेंबर पर्यंत खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे.
योग्य अर्थ व महत्व सांगणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना दि.१० डिसेंबर रोजी वाकड येथे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करून बक्षीसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास ५ हजार रूपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार आणि तृतीय क्रमांकास २ हजार रूपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
दि.०५ डिसेंबरपर्यंत सदर तीन मिनिटांचा व्हिडिओ खालील व्हॉट्सअप नंबर वर पाठवणे.
9595550010, 7058925085, 9850602574, 8149660968.