पिंपरी (Pclive7.com):- शहरातील व्यायामप्रेमींसाठी चिंचवडच्या गांधी पेठेतील कमला कॉर्नर येथे अत्याधुनिक व अद्ययावत व्यायाम साधनांनी सुसज्ज व प्रशस्त व्यायाम शाळा (जिम) ‘अल्फा फिट’चे उद्घाटन मराठी मालिकांमधील ‘मॅचो मन’, ‘जय मल्हार’फेम अभिनेते देवदत्त नागे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील व्यायामप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ५५०० चौ.फूट इतक्या प्रशस्त जागेत या व्यायाम शाळेची निर्मिती झाली असून, व्यायामासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अतिअत्याधुनिक व्यायाम साधनांचा या जिममध्ये समावेश असल्याचे ‘अल्फा फिट’चे संचालक राहुल हनुमंत शिंदे व मृण्मयी राहुल शिंदे या दांपत्याने सांगितले.
एक नामांकित शारिरीक प्रशिक्षक-मार्गदर्शक (फिजिकल ट्रेनर व इंस्ट्रक्टर) म्हणून राहुल शिंदे यांचा चिंचवड परिसरात नावलौकिक असून गेली काही वर्षे परिसरातील अनेक नामांकितांसह शेकडो व्यायामपटूंनी त्यांचे वैयक्तिक मार्गदर्शन घेतले आहे.


























Join Our Whatsapp Group