पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेच्या आराखड्यावर प्राप्त झालेल्या हकरतींवर शुक्रवारी (दि.२५) चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात सुनावणी घेतली जाणार आहे. ही सुनावणी एका दिवसात पूर्ण केली जाणार आहे.

त्रिसदस्यीय एकूण ४६ प्रभागांसं दर्भात एकूण ५ हजार ६८४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या हरकतींचे आठ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्या गटानुसार हरकती नोंदविणाऱ्या अर्जदारांना बोलविले जाणार आहे. कर संकलन विभागामार्फत हरकतदारांना सुनावणीबाबत नोटीसा देण्याचे काम सुरू आहे.
सुनावणीला सकाळी दहाला सुनावणीस सुरूवात केली जाणार आहे. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे सुनावणी घेणार आहे. त्यावेळी महापालिका व राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Tags: PCLIVE7.COMPCMCPcmc newsPimpri Chinchwadपिंपरी चिंचवड महापालिकाप्रभाग रचनामहापालिका निवडणूकसुनावणीहरकती
























Join Our Whatsapp Group