पिंपरी (Pclive7.com):- आज पिंपरी चिंचवड शहर हे जगातील शहरांपैकी एक अत्यंत सर्वांगिण दृष्ट्या विकसित झालेले शहर म्हणून ओळखले जात आहे. हे घडवत असताना यात अनेकांचे योगदान आहे. परंतु याही पुढे आणखी काही पावले या शहराला मार्गक्रमण करावी लागणार आहेत. केवळ संपन्न शहर म्हणून याची ओळख न राहता उद्याच्या जगाला आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी या शहरात उपलब्ध झाल्या पाहिजेत व उद्याच्या जगाचा हा होरा ओळखून शहराला त्या दृष्टीने पुढे नेण्याची कुवत असलेल्या मोजक्या नावांमध्ये अमोलजी थोरात हे नाव अग्रक्रमाने ओळखले जाते.

अमोलजी थोरात हे या शहराचा उद्याचा चेहरा असणार यात कोणतीच शंका नाही. एक सामाजिक व राजकीय द्रष्टेपणा अमोलजींकडे आहे. आणि त्याच्यामुळे उद्याच्या आधुनिक युगातील अग्रस्थानावर असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे भाग्यविधाते म्हणून या युवा नेतृत्वाकडे म्हणजेच अमोलजींकडे बघितले पाहिजे.

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा।।
असा श्लोक संस्कृतात आहे शूर व्यक्ती शंभरात एखादी असते, हजारो लोकांच्यात एखादा पंडित असतो, वक्ता दहा हजार लोकांच्यात एखादा असतो. तर गाणारी व्यक्ती लाखात एखादी असते. संस्कृतातील या श्लोकाप्रमाणे या सर्वच मूलभूत तत्त्वांमध्ये अमोलजी थोरात यथायोग्य बसतात. एखाद्या नेत्यांमध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या सर्वच बाबी अमोलजी थोरात यांच्याकडे आहेत. ते स्वतः विद्वान तर आहेतच पण त्याचबरोबर चांगले वक्ते म्हणून देखील ओळखले जातात. अत्यंत अभ्यासू सामान्य माणसासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी आणि पक्षासाठी कोणत्याही भूमीवर लढण्याची तयारी हे गुण पिंपरी चिंचवड शहराने पाहिले आहेत. आजच्या जगात केवळ संपत्ती दान दिल्याने दानी ठरत नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारा माणूस सुद्धा दानशुर या व्याख्येमध्ये बसू शकतो. अमोल थोरात हे या अर्थाने नक्कीच लाखात एक असे या शहराचे नेतृत्व म्हटले पाहिजे.

आज आपण अमोल थोरात हे नाव जरी घेतले तरी आपल्या समोर एक सयंमी, शांत आणि अभ्यासू असे व्यक्तीमत्व समोर येते. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले, परंंतु मनात जर जिद्द असेल तर माणूस कोणतेही कष्ट करण्यास तयार असतो, असेच काहीसे अमोलजी थोरातांच्या बाबतीत घडले. ते स्वतः उच्चशिक्षीत तर आहेतच, परंतु त्यांनी इतरांना देखिल शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर केले. पण बालपणापासून स्वयंसेवक संघाची शिकवण त्यांच्या अंगी असल्यामुळे त्यांनी समाज कार्यात स्वतःला वाहून घेतले. आणि भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ते झाले. मात्र राजकारण करत असताना त्यांनी प्रथम समाजकारण नंतर राजकारण असे समिकरण अंगिकारले आणि त्यामुळे त्यांनी समाजात आपले नावलौकीक कमाविले.

अमोलजी थोरात हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे खास विश्वासू.. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत टाकलेल्या जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. संघटन सरचिटणीस म्हणून त्यांनी तीन टर्म तसेच सहा वर्षे प्रवक्ता ही जबाबदारी अत्यंत यशस्वी रित्या पार पाडली.
आपण ज्यावेळी एखादे झाड लावतो, त्यावेळी त्याच्याकडून फळाची अपेक्षा होणे सहाजिकच आहे. मात्र अमोलजी थोरातांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष संघटनेसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. मात्र त्यांनी कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. त्यांनी स्वतःला झोकून देवून पक्ष संघटन उभे करून शहरात भारतीय जनता पक्षाचा पाया मजबुत केला. शहरातील तरूणांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. शहरातील भाजप सदस्य नोंदणीचे प्रमुख म्हणून काम पाहिले, आणि त्यांनी शहरातून मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करून घेतली. ही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.
भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मर्जीतील म्हणून देखिल त्यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांना दादा आणि भाऊ यांना जोडणारा दुवा असे संबोधले जाते.
अमोलजी थोरात हे भाजपाचे एकनिष्ठ आणि सच्चे कार्यकर्ते आहेत. शहरातील बुथ रचनेचे प्रमुख म्हणून देखिल त्यांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. त्यांच्याकडे एक तरूण नेतृत्व म्हणून पाहिले जाते. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची पध्दत यामुळे ते शहरातील जनमाणसांच्या हृदयात घर करून बसले आहे. त्यांनी दोन लोकसभा आणि दोन विधानसभा असे काम केले आणि त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून गेले. 2019 च्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या समन्वयक म्हणून त्यांच्यावर पक्षांने टाकलेली जबाबदारी पार पाडून पुन्हा एकदा आपण पक्षाशी एकनिष्ट आहोत हे दाखवून दिलेे.
थोरात हे चुकीच्या कामांना विरोध आणि चांगल्या कामांचे नेहमीच कौतुक करतात. त्यांचा स्पष्टोक्तीपणा यामुळे ते आज संपुर्ण शहरात परिचित आहेत. संघटन सरचिटणीस हा पुढे न येता पडद्यामागे काम करतो, तसेच अमोलजी थोरातांनी देखिल केले. अनेक गरजुंना त्यांनी मदत तर केलीच, परंतु त्याचे श्रेय त्यांनी कधीच घेतले नाही. दोन वर्षापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्यावर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदार संघाच्या समन्वयक ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि दोन वर्षापूर्वीच त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजप 100 पार हा नारा दिला होता, आणि त्या दृष्टीने आखणी देखिल सुरू केली. परिणामी येणार्या महापालिका निवडणूकांमध्ये ते पुर्ण 100 आकडा पुर्ण करतील यात शंकाच नाही. अमोल थोरात यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा…!!