पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार उद्या पिंपरी चिंचवड शहराच्या दौरावर आहेत. शहरातील प्रमुख गणेश मंडळांना अजितदादा भेट देणार आहेत.
गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार उद्या गुरूवारी (दि. ८) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय.

अजितदादांचा दौरा पिंपरी चिंचवड शहरात दुपारी सुरू होणार आहे. गुरूवारी दुपारी थेरगावमध्ये येणार आहेत. माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्या मंडळाला अजितदादा भेट देणार आहेत. तिथून त्यांचा भेटीगाठींचा दौरा सुरु होणार आहे. तो रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. एकाच दिवशी ते शहरातील मोठ्या गणेश मंडळांना भेटी देणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.
गणेश मंडळांच्या आरतीसह उत्सवातील इतर कार्यक्रमांनाही ते हजेरी लावणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती मिळतेय.
























Join Our Whatsapp Group