पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून गेल्या चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (दि.१६) रोजी सकाळी ८ वाजता ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज सकाळी ०८:०० वाजता २१०० क्युसेक व पावर आऊटलेट १४०० असे एकुण ३५०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. तरी नदी तिरा कडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारे पाण्याचं प्रमाण बघुन धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.
Tags: MavalPawana DamPawana RiverPimpri Chinchwadनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारापवना धरणपिंपरी चिंचवडमावळ
























Join Our Whatsapp Group