पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘इंडियन स्वच्छता लीग‘ या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त स्वच्छता, जनजागृती फेरी आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात नागरिकांनी ऑनलाइन नावनोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केली आहे.

आयुक्त म्हणाले, या मोहिमेचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे यांची नियुक्ती केली आहे. या मोहिमेसाठी शहराची स्वतंत्र थीम तयार करण्यात आली आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी शहरातील नागरिकांनी शनिवारी (दि.१७) सायंकाळी सहापर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करावी. जास्त संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्यास केंद्र शासनाकडून पुरस्कार दिला जाणार आहे.
या उपक्रमात नदीकाठ, स्मारकेआणि टेकड्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. प्लॉगेथॉन मोहीम निगडीतील दुर्गादिवी टेकडी, सांगवीतील वेताळ महाराज घाट, चिंचवडमधील मोरया मंदिर घाट, भारतमाता चौक ते इंद्रायणी नदी घाट, पिंपळे गुरव नदी किनारा, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, थेरगावातील केजूबाई बोट क्लब, भोसरी सहल केंद्र, निगडीतील भक्ती – शक्ती समूह शिल्प चौक ते त्रिवेणीनगर या ठिकाणी मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी घरासोबत बाहेरील स्वच्छता पाळून या मोहिमेत सहभागी व्हावे, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group