पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. धरण शंभर टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्गही सातत्याने वाढविण्यात येत आहे. आज (दि.१६) सकाळी ८ वाजता पाण्याचा ३५०० क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सातत्याने पाऊस वाढत असल्यामुळे दुपारी एकपासून ६४०० क्युसेस व पावर आऊटलेट १४०० असे एकूण ७८०० क्युसेक वाढविण्यात आला होता. त्यानंतर आता दुपारी ३ वाजता धरणाच्या सांडव्यातून ६४०० क्युसेक वाढवून ८६०० क्युसेक आणि पॉवर आऊटलेटमधून १४०० असे एकूण १० हजार क्युसेक करण्यात आले आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे यंदाही धरण ऑगस्ट महिन्यातच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यानंतरही धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे. अनेकवेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पवना धरण परिसरात पावसाने हजेरी लावली. धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी ३ पासून ६४०० क्युसेक वाढवुन ८६०० क्युसेस व पावर आऊटलेटसाठी १४०० असे एकूण १० हजार क्युसेक वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पवना नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच पावसाचा जोर पाहून पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Tags: धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारापवना धरण परिसरपिंपरी चिंचवडमावळ
























Join Our Whatsapp Group