पुणे (Pclive7.com):- कोंढवा भागातील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने छापा टाकला. या कारवाईत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर २३ येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयातही राष्ट्रीय तपास विभागाने पहाटे धाड टाकली होती. यातून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल
देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आज पहाटेच्या सुमारास कोंढवा भागातील पथकाने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. तेथून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Tags: एनआयएएनआयएचा छापाकोंढवापुणेपुण्यातील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयएचा छापापॉपुलर फ्रंट ऑफ इंडियासंघटनेचे मुख्य कार्यालय
























Join Our Whatsapp Group