पिंपरी (Pclive7.com):- क्षयरोग (टी.बी.) मुक्त भारताची संकल्पना समोर ठेवून प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार येत आहे. यासाठी राष्ट्रपती यांच्या हस्ते ९ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान या महत्त्वकांक्षी योजनेचा काल्पनिक शुभारंभ करण्यात आला असून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महागनरपाकिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांनी केले.

क्षयरुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना पूरक आहाराची गरज असते. अनेकवेळा परिस्थिती नसल्याने अनेक लोक आहार घेत नाहीत. शासनाकडून दिली जाणारी मदत अपुरी ठरते. यासाठी निक्षय मित्र क्षयरोग रुग्ण दत्तक मोहीम राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीम अंतर्गत आपल्या शहरातील क्षयरोग असलेल्या रुग्णांना पौष्टीक आहार देण्यासाठी राज्य शासनाने आवाहन केले आहे.
या अंतर्गत आपल्या शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधींनी रुग्ण दत्तक घेतले असून वर्षभर या रुग्णांना दर महिन्याला पौष्टीक आहार देण्यात येणार आहे. या रुग्णांना आहार देण्याचा कार्यक्रम आज आकुर्डी येथील क्षयरोग नियंत्रण केंद्रात पार पडला. यावेळी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली ढोणे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शीतल शिंदे, सुलक्षणा शिलवंत, तुषार कामठे, उद्योजक विनोद आडसकर, सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद आदी उपस्थित होते.
या सर्व अधिकार्यांकडून जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





















Join Our Whatsapp Group