पुणे (प्रतिनिधी):- स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण थिएटरसमोरील प्रिती हॉटेलला सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची झाले आहे.
सोमवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या काही भागातून अचानक धूर येत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या दोन फायर गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.
























Join Our Whatsapp Group