पिंपरी (Pclive7.com):- सौर उर्जेवरील प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटींचे कर्ज मिळवून देतो असे सांगून ७९ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीतील मारूंजी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्याधर काशीनाथ जोशी (रा. कॅनॉल रोड, कर्वेनगर, पुणे), परेश शहा (रा. एस. व्ही.रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने फसवणूक झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांकडे दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर उर्जेवरील प्रकल्पासाठी २०० कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आरोपींनी संबंधित महिलेला ७९ लाख रूपये बँक खात्यात ऑनलाइन भरायला लावले. त्यानंतर कर्जही दिले नाही आणि ७९ लाख रूपयेही परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार महिलेने हिंजवडी पोलिसांकडे दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहे.

























Join Our Whatsapp Group