पिंपरी चिंचवड बंदच्या आंदोलनात छत्रपती संभाजीराजे सहभागी
पिंपरी (Pclive7.com):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आज पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला असून नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलकांना संबोधित केले.

आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती महाराजांबाबत दोनवेळा वादग्रस्ते विधाने केली आहेत. तरी देखील त्यांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही. कसली एवढी मग्रुरी आहे हे कळत नाही. आता यांनी दिलगिरी व्यक्त केली तरी आता आम्ही ती मान्य करणार नाही.
आम्हाला हा राज्यपाल नको, त्याला महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या. हे जर घडले नाही तर महाराष्ट्र बंद शिवाय पर्याय नाही. राज्यपालानंतर तीन व्यक्तींनी छत्रपतींचा अवमान केला. किती दिवस हे सहन करायचे कधीतरी पक्षाच्या पुढे पाहिले पाहिजे. महाराष्ट्र बंदचा माझ्यावर दवाब होता पण लोकांना वेठीस धरायला नको म्हणून मी याबद्दल घोषणा केली नाही. आजच्या बंद मध्ये दोन पक्षांचे लोक सहभागी झाले नाहीत मी जर त्या पक्षांशी निगडित असतो तर पक्षाचा दवाब झुगारून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आलो असतो असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
Tags: Bhagat Singh KoshyariChatrapati Sambhajirajelatest marathi newsMaharashtra ShutdownMarathi NewsPcmc Marathi NewsPimpri ChinchwadPimpri Chinchwad ShutdownTop Marathi News
























Join Our Whatsapp Group