पिंपरी (Pclive7.com):- खेळताना पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. समतानगर कॉलनी, थेरगाव येथे गुरुवारी (दि.२) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोहम्मद फैजल मोहम्मद तारीक खान, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खान कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशात येथील असून ते सध्या समतानगर कॉलनी येथे भाडेतत्त्वारील एका खोलीत वास्तव्यास आहेत. तारीक खान हे काचा बसवण्याचे काम करतात. तर, त्यांची पत्नी जोहरुबी गृहिणी आहेत. तारीक आणि जोहरुबी हे दोघेही मोहम्मद फैज (वय ३) आणि मोहम्मद फैजल या दोन्ही मुलांसह गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घरात झोपले होते. त्यावेळी एक वर्षांचा फैजल हा झोपेतून उठून मोरीत गेला.
तेथे प्लास्टिकच्या २० लिटरच्या बादलीमध्ये पाणी होते. पाणी खेळत असताना फैजल बादलीत पडला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याची आई जोहरुबी उठल्या असता फैजल हा बादलीतील पाण्यात पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मोहम्मदफैजल याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group