पिंपरी (Pclive7.com):- जाधववाडी येथील कुदळवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून त्यांचा त्रास होत असून त्यांचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा यासाठी माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

कुदळवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून त्यांचा त्रास महिला व लहान मुलांना तसेच वाहनचालकांना होत आहे. लहान मुले खेळताना अचानक कुत्रे आल्या मुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे तसेच वाहनचालकांच्या मागे कुत्रे धावतात त्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





















Join Our Whatsapp Group