पिंपरी (Pclive7.com):- दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरीच्या दोन लाख ३० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली. मोहंमद राशीद शाहीद शेख (२०, रा. वल्लभनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू होती.
दरम्यान, आरोपी मोहंमद राशीद हा संशयितपणे फिरताना पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, पोलिस अंमलदार हेमंत खरात, डी. बी. केंद्रे, रमेश भोसले, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
























Join Our Whatsapp Group