पिंपरी (Pclive7.com):- सध्या पहाटेच्या आकाशात तीन पेक्षा जास्त ग्रह एका रेषेत दिसत असल्याने आकाशप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोनपेक्षा जास्त ग्रह एका वेळी एका रेषेत दिसतात या घटनेला’ प्लॅनेटरी परेड’ म्हटले जाते. यातील दोन ग्रह उघड्या डोळ्यांनी आपापल्या ठिकाणहून पाहता येतील. या घटनेचे निमित्त साधून पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे ३ ते ९ जून दरम्यान तारांगणात खास शो घेण्यात येणार आहेत. या शोजमध्ये तज्ञांद्वारे नक्की किती वाजता, कोणत्या दिशेला, काय दिसणे अपेक्षित आहे यासोबत सद्य आकाशाबद्दल इतरही शास्त्रीय माहिती देण्यात येईल.
दररोज ६ शोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान एका तासाच्या अंतरावर घेतले जातात. यांत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत प्रत्येकी २ शोज असतात. यासोबत तारांगण आवारात ‘जर्नी विथ लाईट’ नावाचे खगोलशास्त्रीय प्रदर्शन देखील पाहता येते.
पिंपरी चिंचवड तारांगण सुरू होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत १ लाख ३८ हजार ७३८ इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी आपल्या शहरातील या नावीन्यपूर्ण सुविधेचा लाभ घेतला आहे. आकाशप्रेमींसाठी ही एक मोलाची संधी असून त्यांनी नक्की लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group