पिंपरी (Pclive7.com):- मावळ कार्ला येथील प्रसिद्धी एकवीरादेवी मंदिराला खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून नवीन कळस सुपूर्द करण्यात आला. मंदिर समितीला कळस सुपूर्द करताना खासदार बारणे यांचे सुपुत्र प्रताप बारणे, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, माऊली घोगरे, अशोक म्हाळसकर, बाळासाहेब हुलावळे उपस्थित होते.
मावळ कार्ला येथील प्रसिद्धी एकवीरादेवी मंदिराचा कळस काही महिन्यापूर्वी चोरीला गेला होता. कळस चोरीस गेल्या नंतर नव्याने कळस बसवण्याबाबत श्रीरंग बारणे यांनी मंदिर विश्वस्थांना पत्र पाठवून विनंती केली होती. मंदीर समितीने ती मान्य ही केली, त्यानुसार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्सचे मालक दिलीप सोनिगरा यांच्या कडून नव्याने कळस तयार करून घेतला. कळस बसविण्याबाबत मंदिर समितीला सुचना दिल्या होत्या. परंतु मंदिर समितीच्या अंतर्गत वादामुळे आज पर्यत कळस बसविण्यात आला नव्हता. दोन दिवसापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडून मंदिर समितीला काही निर्देश प्राप्त झाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा मंदिर समितीकडे कळस बसविण्याबाबत विनंती केली. त्यानुसार आज खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र प्रताप बारणे यांनी एकवीरादेवी गडावर जाऊन मंदिर समितीकडे नव्याने बनविण्यात आलेला कळस सुपूर्द केला. लोकसभेचे अधिवेशन असल्याने खासदार श्रीरंग बारणे दिल्ली मध्ये असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्याच्यावतीने त्यांचे सुपुत्र प्रताप बारणे, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, माऊली घोगरे, अशोक म्हाळसकर, बाळासाहेब हुलावळे उपस्थित होते.
मंदिर समितीला कळस सपुर्द करत असल्याची कल्पना मंदिर समिती अध्यक्ष अनंत तरे व शिवसेना पक्षप्रमुख उध्वजी ठाकरे यांना दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group