पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व हेमंत डांगे यूथ फाउंडेशनच्या वतीने, गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२४ चे आयोजन तालेरा हॉस्पिटल रोड, डांगे बिल्डिंग राजमाता जिजाऊ कॉलनी समोर चिंचवड गाव येथे करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी ३ लकी ड्रॉ घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे यांनी म्हटले आहे की, या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ओवन, द्वितीय क्रमांकास मिक्सरचा संपूर्ण सेट तर तृतीय क्रमांकास होम थिएटर आणि उत्तेजनार्थ (६ नंबर) इस्त्री बक्षिस देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख सोमवार (दि.९) सप्टेंबर राहील. फोटो (दि.१०) ते (दि.१२) सप्टेंबर पर्यंत पाठवावे यानंतर आलेल्या नोंदी ग्राह्य धरली जाणार नाही.
तसेच गौरी- गणपतीची सजावट पूर्णपणे पर्यावरण पुरक व घरगुती पद्धतीने केलेली असावी. सजावटीचे २ फोटो, व्हिडिओ, नाव व पत्ता ९७१६८९२३४५ या नंबरवर पाठवावे. गौरी-गणपती सजावटीचा व्हिडिओ १ मिनिटापेक्षा जास्त नसावा, संयोजन समितीचे सदस्य सजावटीची पाहणी करण्याकरिता आपल्या घरी भेट देतील. हि स्पर्धा फक्त चिंचवड गावातील रहिवाशांकरिता असेल. नाव नोंदणीसाठी ९७१६८९२३४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांस आकर्षक भेटवस्तू दिली जाईल असे आयोजक हेमंत डांगे यांनी सांगितले.
























Join Our Whatsapp Group