पिंपरी (Pclive7.com):- आता इंटरनेटचा जमाना आहे. तुम्ही जर गुगलवर ‘फेकू’ हा शब्द टाईप केलं तर नरेंद्र मोदी यांचे नाव येतं अशी खिल्ली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडवली.
काळेवाडी येथे आयोजित हल्लाबोल सभेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पिंपरी चिंचवडची ओळख अजित पवारांमुळेच होती. मात्र आज शहराची ओळख हरवली जात आहे. भाजपाच्या खोट्या आश्वासनाला जनता फसली आहे. तुम्ही इंटरनेटवर जर फेकू हा शब्द टाईप केला तर नरेंद्र मोदी हे नाव येत. मला हे फेकू रोजच पार्लमेंटमध्ये दिसतात. साडेतीन वर्षात त्यांचे प्रत्येक भाषण ऐकलं आहे. दरवेळी नवीनच काहीतरी फेकत असतात. स्मार्ट सिटी देखील त्यातलाच एक भाग आहे.






















Join Our Whatsapp Group