पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड आणि देहूरोड परिसरात दहशत पासरविणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतल्या ७ गुन्हेगारांना काळेवाडीतल्या ऍक्सिस बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली. त्यांच्या कडून ३ गावठी पिस्तूल तलवार कोयत्यासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तर विभाग गुंडा स्कॉड गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी पहाटे पेट्रोलिंग सुरू होते. काळेवाडीतील कुणाल हॉटेल शेजारील मोकळ्या मैदानात पोलीसांना संशयास्पदरित्या हलचाली दिसल्या. त्यावेळी शेजारीच असलेल्या अँक्सिस बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी असल्याचे दिसून आले. पोलीसांना पाहताच टोळक्याने तेथून पळ काढला. त्यावेळी गुंडा स्कॉडच्या पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. वाकड पोलीसांची मदत घेऊन रावेत येथे या टोळक्याला पोलीसांनी पावने पाचच्या सुमारास पकडले. त्यांची झाडाझडती केली असता त्यांच्याकडून कडून ३ गावठी पिस्तूल, तलवार कोयत्यासह, मिरची पावडर, दुचाकीसह, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यात विनोद निजाप्पा गायकवाड (वय २४, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड), विकी राजू जाधव (वय २०, रा. जाधव वस्ती, रावेत), सनी अनिरूध्द चोपडे (वय १९, जाधव वस्ती, रावेत), किरण शिवाजी खवले (वय २०, रा. ओटास्किम, निगडी), शिवकुमार बसवराज बनसोडे (वय २४, रा. रावेत), गंगाधर देवेंद्र नाटेकर (वय १९, रा. रावेत), राजू शंकर बनकर (वय ४६, रा. जाधववस्ती रावेत) या ७ जणांना पोलीसांनी पाठलाग, झटापट करून शत्रांस्त्रासह अटक केली. दरम्यान या कारवाईच त्यांचे ३ साथीदार पसार झाले. पुढे तपास केला असता हे सर्वजण रावण साम्राज्य टोळीतील गुन्हेगार असल्याचे समोर आले. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पिंपरी चिंचवड आणि देहूरोड परिसरात लुटमार, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिस निरीक्षक ब्राह्मनंद नायकवडी यांच्या नेतृत्वात सहाययक पोलिस निरीक्षक गणेश पवार, तानाजी गाडे, अतुल मेंगे, विष्णू पांडुळे, भालचंद्र बोरकर, राज नारायण देशमुख, किरण चोरगे, निलेश शिवतरे, राजू मोरे , दीपक भुजबळ, प्रदीप शेलार, रमेश भिसे, दत्ता फुलसुंदर, शीतल शिंदे यांनी पार पाडली.
























Join Our Whatsapp Group