पिंपरी (Pclive7.com):- अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.६) सायंकाळी पुणे-मुंबई महामार्गावर घोरवडेश्वर डोंगराजवळ करण्यात आली.

अशोक बाळू भारती (२२, रा. कासार आंबोली, मावळ), प्रशांत ऊर्फ पैलवान शांताराम आंबेकर (२६, रा. देवळे, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रीतम सानप यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला प्रदीप सिरॅमिक क्रोकरी समोर दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून ओंकार भारती आणि प्रशांत आंबेकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झेडती घेतली असता त्यांच्याकडे ५५ हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group