पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीतून ही अटक करण्यता आली आहे. प्रांजल हे शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत.

प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास प्रांजल खेवलकर हे त्यांच्या मित्रा सोबत पार्टी करीत होते. याबाबत माहिती मिळाली असता, आमच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी त्या कारवाईमध्ये दारु, गांजा आणि हुक्का हा साठा आढळून आला आहे. तर या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात जावयावर कारवाई झाल्याने आता एकनाथ खडसेंवर टीका केली जात आहे.


























Join Our Whatsapp Group