
लोणावळ्यातील एका तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. नंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला ढकलून देत तिथून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा बलात्कार प्रकरणात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला १२ तासांत अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शनिवारी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित एकच खळबळ उडाली होती. तरुणीची वैद्यकीय तपासणी करत दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुंगार्ली येथील नारायणीधाम मंदिरापासून तरुणी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पायी जात असतानाच कारमधून आलेल्या तीन तरुणांनी तिचे तोंड दाबून तिला जबदरस्ती कारमध्ये बसवलं. त्या तिघांनी तिचे हात पाठीमागे बांधून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी तिचे कपडे काढून तिला विवस्त्र केले त्याचबरोबर तिला मारहाण देखील केली. रात्री नऊ वाजल्यापासून तीन जणांनी कारमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला नांगरगाव येथील एका रस्त्याच्या कडेला फेकले. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.
























Join Our Whatsapp Group