पिंपरी (Pclive7.com):- नाशिकफाटा जवळ शंकरवाडी येथे चेंबरमध्ये पडलेल्या श्वानाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले आहे.

नाशिक फाट्याजवळ शंकरवाडी येथे आज सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास एक श्वान चेंबरमध्ये पडल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाला मिळाली.

माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रातून पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचून दोराच्या सहाय्याने श्वानाला चेंबरमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
























Join Our Whatsapp Group