पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातून जात असलेल्या पवना आणि इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. गेल्या कित्तेक महिन्यांपासून प्रशासनाच्या उदासिनतेने अक्षरश: नद्यांना जलपर्णीचा विळखा पडलायं. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. ठेकेदाराला पोसण्यासाठी प्रशासन जलपर्णी काढण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे तसेच विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना जलपर्णीचा गुच्छ देत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
यावेळी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, माई काटे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक राजू बनसोडे, श्याम लांडे आदी उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group