पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर येथील वसंत दादा पाटील विद्यालयाच्या मागील बाजूस एका घरीत गॅस सिलिंडरची गळती होऊन मोठा स्फोट झाला. यात घरातील ४ जण जखमी झाले आहेत. ही सकाळी ८ च्या सुमारास घडली. हा स्फोट एवढा भीषण होता की, घराचे पत्रे फुटून उडून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील वसंत दादा पाटील विद्यालयाच्या मागील बाजूस एका भाड्याच्या खोलीत सुरेंद्र सिंग (वय ३५) हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. गुरुवारी रात्री सर्व सर्वजण जेवण करून झोपले होते. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास झोपेतून उठल्यावर घरातील एकाने विजेचे बटण दाबल्यावर अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये संंदीप सिंग (वय १९) दुर्गेश सिंग (वय १२) हे गंभीर जखमी झाले तर सुरेंंद्र यांच्या पत्नी अनिता सिंग (वय ३२) शिवा दुर्गे (वय १४) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
या सर्वांना उपचारासाठी यशंतराव चव्हाण रुग्णालय दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटात घरातील पत्रे उडून घराचे आतील सर्व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.
























Join Our Whatsapp Group