
पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणी नगर भोसरी येथे इंद्रायणी युवा प्रतिष्ठान वतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने गोपाळ भक्तांनी या सार्वजनिक उत्सवाला हजेरी लावली, तसेच उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या दहीहंडी उत्सवाला प्रमुख आकर्षण होते सिनेतारका त्रिधा चौधरी (फेम – आश्रम, द चार्जशीट, बंदिश बॅडिट्स), जिया शंकर (फेम – वेड, बिगबॉस हिंदी, ओटीटी २०२३) हे होते.

यावेळी सचिन भैय्या लांडगे (कामगार नेते), अजित दामोदर गव्हाणे (माजी नगरसेवक), शामजी अगरवाल (उद्योजक), सुलभा उबाळे (उपगट नेत्या – शिवसेना शिंदे गट), रवी भाऊ लांडगे (माजी नगरसेवक नगरसेवक), विलास मडीगेरी (माजी नगरसेवक) आदी मान्यवर उपस्थित होते.

इंद्रायणी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी फोडण्याचा मान झित्राई देवी गोविंदा पथक चाकण, झित्राई मळा (संस्थापक अध्यक्ष श्री सत्यवान बनकर) यांना मिळाला.

























Join Our Whatsapp Group