पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण ९९.१४ टक्के एवढे भरलेले असून सध्या नदीपात्रात एकूण २१३० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे १४०० क्युसेक्स व सांडव्याद्वारे ७३० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस बरसत असल्याने आज (दि.१९) सकाळी ९ वाजता सांडव्याद्वारे होणारा विसर्ग वाढवून १४६० क्युसेक्स करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील एकूण विसर्ग २८६० क्युसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

धरणातून होणारा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group