पिंपरी (Pclive7.com):- दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.१७) दुपारी ऑरा हॉटेल, पूर्णानगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी सूरज रामदास घोडे (२५, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, रा. घरकुल, चिखली, पुणे), राजा युवराज हजारे (२८, रा. घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड ऊर्फ बन्या (३०, रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज त्यांच्या मित्रांसोबत ऑरा हॉटेलमध्ये दारू पीत होते. तेव्हा आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी आशुतोष याने सूरज यांना मी जेलमधून बाहेर आल्यापासून तुला बघतोय, तू जास्त शहाणपणा करतोयस, तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्याने टेबलवरील ग्लास आणि दारूची बाटली उचलून सुरज यांच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले.

सूरज यांचे मित्र अविनाश, धीरज आणि गणेश यांनी आरोपी आशुतोष याला पकडले असता, आरोपी राजा याने बाजूच्या टेबलावरील बिअरची बाटली उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी राजा आणि शैलेश यांनी टेबलवरील दारूच्या बाटल्या आणि ग्लास फिर्यादीवर फेकून मारले. आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. चिखली पोलिस तपास करत आहेत.

























Join Our Whatsapp Group