

पिंपरी (Pclive7.com):- बीड व सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याचे कार्य कार्यक्षम नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने हाती घेतले आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक साहित्याचे किट तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मदतपथक रवाना झाले आहे.

या मदतीच्या उपक्रमात रिपाईचे माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते संदीप कापसे, शेखर अहिरराव, अतुल वाणी, किशोर येळवडे, वीरेंद्र यादव, अनिस अन्सारी, शहाजी अत्तार, राजेंद्र वाघेरे, कुणाल सातव, कुणाल साठे, अक्षय नाणेकर, निखिल जुनागरे राहुल गवळी, राकेश मोरे, हनुमंत वाघेरे, सतीश भवाळ, अमित कुदळे, गणेश मंजाळ, शुभम मिटकरी, रवी ससाने, प्रवीण तडसरे, महेश वडमारे, अभिजित गायकवाड, बाळू आंबूसकर व इतर सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे.

या पथकाने अन्नधान्य, पाणी व अत्यावश्यक वस्तूंचे किट तयार केली असून, ती थेट पूरग्रस्तांच्या हातात सुपूर्त करण्यात येणार आहे.

“संकटाच्या काळात एकमेकांना साथ देणे हीच खरी माणुसकी आहे,” असे प्रतिपादन संदीपभाऊ वाघेरे यांनी या प्रसंगी केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे कार्य पुढील काही दिवस सुरू राहणार असून, गरजूंपर्यंत योग्य मदत पोहचवण्यावर भर दिला जाणार असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे.



























Join Our Whatsapp Group