पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे बीआरटी रस्त्यावरील, दर्शले चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस व वार्डनची नेमणूक करावी अशी मागणी युवा सेना चिंचवड विधानसभा उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

सागर शिंदे यांनी यासंदर्भात वाकड वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुनावळे बीआरटी रस्त्यावरील, दर्शले चौक परिसरात वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. या ठिकाणी विशेषतः सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहनांची मोठी रांग लागते, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो आणि तणाव वाढतो. याशिवाय, अपघातांचा धोकाही वाढला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी. वाहतूक वार्डनची नियुक्ती करण्यात यावी. तसेच सिग्नल यंत्रणेतही सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांची नेमणूक : दर्शले चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, जेणेकरून वाहतुकीचे नियमन प्रभावीपणे होईल.
वाहतूक वार्डनची नियुक्ती: गर्दीच्या वेळी अतिरिक्त वाहतूक वार्डन नेमून वाहतुकीचा प्रवाह सुधारावा.
सिग्नल यंत्रणेची सुधारणा : चौकातील सिग्नल यंत्रणा तपासून त्याची कार्यक्षमता वाढवावी. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांना सुरक्षित व गतिमान प्रवासाचा अनुभव मिळेल.