चिंचवड (Pclive7.com):- चिंचवडगाव येथे हेमंत डांगे युथ सोशल फाउंडेशन आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण व नवदुर्गा सन्मान सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रभाग क्रमांक १८ चिंचवडगाव येथील गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२५ चा बक्षिस समारंभ व प्रभागातील कर्तृत्ववान महिलांना कर्तृत्ववान नवदुर्गा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील सिध्दीविनायक हाॅल येथे पार पडला. यावेळी प्रभागातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी डाॅ. सिध्दी नेवाळे (चिंचवडे), ज्योती निंबाळकर, आरती शेट्टी, अश्विनी दळवी, वैशाली मराठे, श्रीप्रिया नागराजन, वर्षा सोनार, राजश्री जाधव, वैशाली देशमाने यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गणपती सजावट स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे..
प्रथम क्रमांक – सुप्रित चव्हाण
द्वितीय क्रमांक – तेजस्वीनी भोसले
तृतीय क्रमांक – सुनिल महाजन
उत्तेजनार्थ – सुनिल भावसार, अनंत दळवी, मयुरी भोईर, विजय गोखले
गौरी सजावट स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे..
प्रथम क्रमांक – रेखा जाजु
द्वितीय क्रमांक – सोनाली काळे
तृतीय क्रमांक – सारीका कुलकर्णी
उत्तेजनार्थ – जिजा घाडगे, रंजना लांडगे, पुनम इंगळे, रमा कुलकर्णी व तीन लकी ड्रॉ देखील काढण्यात आले.
या कार्यक्रमास माजी महापौर अपर्णा डोके, मधुकर बच्चे (भाजप सरचिटणीस), अनिकेत प्रभु (मनविसे शहराध्यक्ष), सागर चिंचवडे (विधान सभा अध्यक्ष रा. कां.शरद पवार गट), रमेश वाळुंज, अनिता पांचाळ (उपशहर अध्यक्ष मनसे), ओंकार पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम तुषार वराडे, निखिल गावडे, नासिर शेख, विशाल साळुंके, शरण्य पाटणे, राहुल मुसळे, प्रज्योत पुजारी, यश कुदळे, शंतनु तेलंग यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन केले. हेमंत डांगे यांनी सर्वांचे आभार मानले.