पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत जिजाबाई महिला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना चिंचवड, दळवीनगर येथील पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. गेल्या कित्तेक वर्षापासून दळवी परिवाराकडून वारकऱ्यांची सेवा कोली जाते.
यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प जालिंदर काळोखे महाराज, ब प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, प्रवचनकार सुप्रियाताई साठे-ठाकुर, दिंडीप्रमुख विजया साठे आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.