रावेत (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मामुर्डी, किवळे, रावेत, गुरुद्वारा आणि वाल्हेकरवाडी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांकडून घरोघरी, सोसायटी-टू-सोसायटी प्रचार सुरू असून मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती देण्यात येत असून, या योजनेमुळे महिलांमध्ये शिवसेनेबद्दल विश्वास आणि सकारात्मक भावना दिसून येत आहे. महिलांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या ठाम विश्वासाचे द्योतक मानले जात आहे.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ (अ गट), ऐश्वर्या तरस (ब गट), सौ. रेश्मा बापूजी कातळे (क गट) आणि निलेश तरस (ड गट) यांनी धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवला. किवळे परिसरात विशेषतः महिला वर्गात रेश्मा बापूजी कातळे आणि बापूजी कातळे यांना मानणारा मोठा वर्ग असून, त्यामुळे या भागात शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, उमेदवारांचे औक्षण करत उत्साहात स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. प्रभागाच्या विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मामुर्डी, किवळे, रावेत आणि गुरुद्वारा परिसरात ‘खीच केताण धनुष्यबाण’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या पॅनेलला भरघोस मतदान करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. एकूणच प्रभाग क्र. १६ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, तिरंगी लढतीत शिवसेनेचे पारडे जड असल्याचे सध्याचे चित्र आहे.






















Join Our Whatsapp Group