भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने तडीपार केलेल्या आरोपीने आदेशाचा भंग करत भोसरी परिसरात कोयता जवळ बाळगून खुलेआम वावर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून भोसरी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली आहे. रमीझ अल्ताफ काझी (वय ३४, रा. नूर मोहल्ला, दिघी रोड, भोसरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही कारवाई (दि.२२) रोजी रात्री गाव जत्रा मैदानजवळ, भोसरी येथे करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीचे विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ व फार्म ॲक्ट ४(२५) तसेच कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी रमीझ अल्ताफ काझी याला ४ जुलै २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दोन वर्षांसाठी (२४ महिने) तडीपार करण्यात आले होते. संबंधित तडीपार आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिला असून तो आदेश पुणे शहर व पुणे जिल्ह्यात लागू होता.

मात्र, तडीपार असतानाही आरोपी भोसरी परिसरात आढळून आल्याने त्याने आदेशाचा स्पष्ट भंग केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोयत्यासह आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ठेकणे करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group