पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील महादेव मंदीर येथे शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवार दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय शिवलिला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे याच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पारायणास सुरूवात करण्यात आली.
यावेळी पाउस चांगला झाल्यामुळे पवनामाई (पवना नदी) चे जलपूजन करण्यात आले. यावेळी शिवशंभो सेवा मंडळांचे संस्थापक हभप माउली हांडे, मंडळांचे अध्यक्ष गणेश काटे, जयसिंग चव्हाण, बाळासाहेब काटे, मंदीराचे पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे तसेच भाविक भक्त, ग्रामस्थ, महीलावर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group