पिंपरी (Pclive7.com):- उद्धवश्री पुरस्कार सोहळा समितीच्या वतीने दिले जाणारे ‘उद्धवश्री पुरस्कार’ झी २४ तासचे प्रतिनिधी कैलास पुरी यांना जाहिर झाला आहे. यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देखील या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (दि. २९) रोजी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज दिली.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दुपारी तीन वाजता हा सोहळा रंगणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या राज्यातील मान्यवरांचा यानिमित्ताने गौरव केला जाणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ हे गेली पंधरा वर्षे याचे आयोजन करत होते. यंदा सन्मानिय सत्कार मुर्तींमध्ये बाळासाहेब लांडगे (क्रिडा), गोपाळ देवांग (क्रिडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दिप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब कऱ्हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रिडा), कैलास पुरी (झी २४ तास वार्ताहार), भूषण तोष्णीवाल (अंध सनदी लेखपाल), डी. एम. खुणे (सनदी लेखपाल), गोविंद दाभाडे (संस्थापक, सरस्वती शिक्षण संस्था), मिलींद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबनराव कांबळे (दै. सम्राट संपादक), या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला कामगार नेते व पुरस्कार समितीचे निमंत्रक इरफान सय्यद, अध्यक्ष माधव मुळे, सचिव गुलाब गरूड, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group