पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्लू’मुळे भोसरी येथील ५२ वर्षीय महिलेचा सोमवारी (दि. २७) उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्वाईन फ्लू’ने दोन बळी घेतले असून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिलेला दि.१६ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ ऑगस्ट रोजी तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, दिवसें-दिवस प्रकृती खालावत चालली. अखेर उपचारा दरम्यान आज तिचा मृत्यू झाला असून बळींची संख्या ६ वर पोहचली आहे.
आजअखेर शहरात ‘स्वाईन फ्लू’चे ३४ रुग्ण आढळले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. महापालिकेकडे सध्या ‘स्वाईन फ्लू’च्या लसीचा व गोळ्यांचाही तुटवडा आहे. याचा ताण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयावर येत आहे. त्यासाठी प्रशासानाने स्थायी समितीकडे तातडीची बाब म्हणून ‘स्वाईन फ्लू’च्या गोळ्या व लस खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.






















Join Our Whatsapp Group