पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत टप-या व हातगाड्यांवर कारवाई करण्यात येत असून जप्त केलेल्या वस्तूंसाठी प्रशासकीय शुल्कांचे दर कमी करण्यास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. अतिक्रमण विभागाचे वतीने अनाधिकृत, विनापरवाना हातगाड्या टपऱ्यांवर एकत्रित कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे. काही व्यावसायिक हातगाड्या, टप-या व जप्त साहित्य परत मिळणेकामी अर्ज महापालिकेकडे करतात. हातगाडी, पथारी यांचे रस्त्यावरील अतिक्रमणासाठी प्रशासकीय शुल्क ६ हजार ४०० रूपये घेण्यात येत होते. ते ३ हजार रूपये करण्यास मान्यता देण्यात आली.
टपरी स्थिर फेरीवाले यांचे अतिक्रमणासाठी आधीचे शुल्क १२ हजार रूपये वरून ६ हजार रूपये व इतर किरकोळ साहित्य अतिक्रमणासाठी आधीचे प्रशासकीय शुल्क २५०० रूपये वरून १००० रूपये प्रशासकीय शुल्क तसेच महापालिका परिसरात फळविक्री/चिकन/भाजीवाले विक्री व इतर व्यवसाय करणेसाठी वाहनाचा वापर करणारे व्यवसायिक वाहनचालक यांचेकडून २५०० रूपये वरून १००० रूपये असे शुल्क आकारण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत कार्यरत सर्व लाभांच्या योजनांचे संपुर्ण कामकाज संगणकीकृत करणेबाबत व त्यांचे इंटिग्रेशन करण्यासाठी येणा-या सुमारे १७ लाख ४३ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
























Join Our Whatsapp Group