पिंपरी (Pclive7.com):- मलेशिया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर गेम स्पर्धेत दहा हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझपदक पटकावून पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविणा-या हरिश्चंद्र थोरात यांचा सत्कार स्थायी समितीच्या वतीने स्थायी समिती सभापती ममता गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सत्कार समारंभाच्यावेळी स्थायी समिती सदस्य विलास मडीगेरी, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, विकास डोळस, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ७ ते १५ सप्टेंबर २०१८ दरम्यान मलेशिया मध्ये या स्पर्धा झाल्या. थेरगाव येथील रहिवाशी असणारे हरिश्चंद्र थोरात यांनी त्यात सहभाग घेतला. त्यामध्ये त्यांनी ब्राँझपदक पटकावले, त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
एशिया पॅसिफिक मास्टर गेम स्पर्धेत ब्राँझपदक विजेते हरिश्चंद्र थोरात यांचा स्थायीत सत्कार
























Join Our Whatsapp Group