पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ येथील अनुसया नामदेव वाघेरे शाळेत भाजपचे नगसेवक संदिप वाघेरे यांच्या हस्ते आज ४०० आयुर्वेदिक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कोरफड(अॅलोबेरा), गवती चहा, पान फुटी (पत्थर फोड), तुळस, नागवेली, पुदिना, ब्रम्ही, ओवा, नागपुणी, काश्मिरी गुलाब, अडुळसा, सदाफुली, तगर, आवळा (रायवळ), गुळवेल इत्यादी रोपांचे प्रत्येकी १० नग अशा एकूण ४०० रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी संदिप वाघेरे म्हणाले की, प्रभागातील नागरिकांना आयुर्वेदिक रोपांचे महत्व समजावे यासाठी या रोपांची लागवड करण्यात आली आहे. हि रोपे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. तसेच निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक रोपे लाभदायी असतात. संपूर्ण प्रभाग हरित करण्याचा मानस असुन प्रभागात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे संदिप वाघेरे म्हणाले.
यावेळी जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दादा पमनानी, स्वामी सर, अशोक कुदळे, उदयान विभाग अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, सहायक उद्यान निरिक्षक खैरे, तापकीर, तसेच अनुसया वाघेरे शाळेचे अमित सर व इतर मान्यवरांच्या उपस्थित या आयुर्वेदिक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
























Join Our Whatsapp Group