पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे नवोदित व हौशी कलाकारांनी एकत्र येत ‘उत्सव’ हे चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये देशभरातील महत्त्वाचे सण व उत्सवांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
सणोत्सवाच्या विविध ४० चित्रांचा प्रदर्शनामध्ये समावेश आहे. तुलिका कला दालनात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सतीश वर्तक, सत्यनारायण, कल्पना मोघे, स्नेहल बडगे, संगीता अगरवाल यांची चित्रे प्रदर्शनात आहेत.
उद्घाटनानंतर केशव इंदूरीकर आणि सतीश वर्तक यांचे व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक झाले. यामध्ये दि.१७ नोव्हेंबर रोजी स्नेहल बडगे यांचे म्युरल्सचे प्रात्यक्षिक तर दि.१८ रोजी अक्षता झांबरे यांचे तैलचित्रात व्यक्तीचित्रणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. हे प्रदर्शन २५ नोव्हेंबर अखेर सकाळी अकरा ते दुपारी आठ या वेळेत खुले राहणार आहे. त्यासाठी प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती चित्रकार सतीश वर्तक यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group