पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, येणारे वर्ष शेतकरी राज्याला सुख-समृध्दी, भरभराटीचे आणि शांततेचे जावो, जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो तसेच राज्यातील आणि केंद्रातील सरकारला सद् विवेक बुद्धी देवो असे साकडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी विठुरायाच्या चरणी घातले.
कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे धाकटी पंढरी श्री विठोबा देवस्थान ताकई (खोपोली) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी स्थायी समिती सभापती उषा वाघेरे पाटील यांच्या हस्ते झाली.
महापूजेनंतर संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की कोकणातील सर्व जनतेचे आणि वारकऱ्यांचे आराध्यदैवत व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठोबा देवस्थान ताकई येथील विठ्ठल-रुक्मिणी ची कार्तिकी एकादशी निमित्त मला व माझ्या पत्नीला महापूजा करण्याचा मान दिला त्याबद्दल देवस्थान कमिटी व ग्रामस्थ, वारकरी सर्वांचा आभारी आहे. आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा धाकटी पंढरीच्या विठुरायाची महापूजा संपन्न झाली असून यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे व यात्रेकरूंचे व व्यापारी वर्गाचे मनापासून स्वागत तसेच ही यात्रा सर्वांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना वाघेरे पाटील यांनी केली.
ते शेवटी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, येणारे वर्ष शेतकरी राज्याला सुख-समृध्दी, भरभराटीचे आणि शांततेचे जावो, असे साकडे विठ्ठल चरणी साकडे घातले आहे. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो तसेच राज्यातील आणि केंद्रातील सरकारला सद् विवेक बुद्धी देवो अशी प्रार्थनी विठुरायाच्या चरणी त्यांनी केली.
























Join Our Whatsapp Group