स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसचे अभिवादन
पिंपरी (Pclive7.com):- स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा भारताच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा आहे. देशातील गोर-गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. त्यांनी शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत कार्यरत राहून देशासाठी बलिदान केले. आधुनिक भारताची पायाभरणी नेहरू-गांधी यांनी केली. एकात्मता, अखंडता आणि विकासासाठी संपूर्ण देशाला इंदिराजींनी आदर्श घालून दिला. आज त्यांच्या विचारांची देशाला उणिव भासत आहे. आगामी काळात देशातील जनता पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसच्या मागे उभी राहिल, असा विश्वास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.
सोमवारी निगडी येथे स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल शहराध्यक्ष मकरध्वज यादव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विष्णू नेवाळे, प्रदेश पदाधिकारी बिंदू तिवारी, वनिता तिवारी, ज्येष्ठ नागरिक सेलचे लक्ष्मण रुपनर, परशुराम गुंजाळ, ॲड. अनिरूध्द कांबळे, हरिदास नायर, विशाल कसबे, बाजीराव आल्हाट, भास्कर नारखेडे, सुधाकर वावरे, वसिम इनामदार, सज्जी वर्की, विठ्ठल कवसे, तारिक रिझवी, अब्दुल मोहंमद, वरूण राधेशाम, ॲड. मोहन अडसुळ, दिपक जाधव, तानाजी काटे, दिलीप पांढरकर, युसूफ इनामदार, विश्वनाथ खंडाळे आदी उपस्थित होते.
साठे पुढे म्हणाले की, नेहरू-गांधी घराण्याचे स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्यानंतरही लक्षणीय योगदान आहे. त्यानंतर गरिबी हटाव सारखी योजना, भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण किंवा 1971 मध्ये बांगला देशाची निर्मिती असेल इंदिराजींनी आपल्या हुशारीची, मुत्सद्देगिरीची चुणूक जगाला दाखवून दिली. त्यांनी सत्तेचा उपयोग उपभोग घेण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनता, दिनदुबळे, गोरगरीब, कष्टक-यांच्या विकासासाठी केला. आजची राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती पाहिल्यास काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व सर्वसामान्यांना समजून येईल. काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास सचिन साठे यांनी व्यक्त केला. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक ब्लॉकमध्ये जनसंपर्क अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा साठे यांनी केली.
यावेळी निघोजे येथे घेण्यात आलेल्या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सुत्रसंचानल मयुर जयस्वाल, आभार शहाबुद्दीन शेख यांनी मानले.
























Join Our Whatsapp Group