
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्ट परिसरात आज भीषण अपघात घडला असून दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरवाडी कोर्ट परिसरात वळण घेत असलेल्या एका कारला समोरून वेगात येणाऱ्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group