पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे यावर्षी पुरुष व महिला खुली टी-२० प्रीमियर लीग दि.०६ एप्रिल २०२६ पासून फोरस्टार क्रिकेट मैदान फेज-३,माण येथे आयोजित करण्यात येणार असून सदर स्पर्धा उदयोन्मुख महिला व पुरुष खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. ही स्पर्धा पांढऱ्या चेंडूवर होणार आहे. महिलांचे सामने २२ एप्रिल २०२६ पासून सुरू होतील तर पुरुषांचे सामने दिनांक ६ एप्रिल पासून सुरू होतील.

दि.२७ मार्च २०२६, शुक्रवार रोजी रामकृष्ण बँक्वेट हॉल, हॉटेल रामकृष्ण, रावेत येथे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते टी-२० स्पर्धा करंडकाचे व संघांच्या टी-शर्टचे अनावरण झाले. यावेळी बोलताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा नवीन उदयोन्मुख खेळाडूंना एक मोठी संधी निर्माण करतात, याचा फायदा सर्व खेळाडूंनी घ्यावा.या स्पर्धांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते व ते आपल्या खेळाचा दर्जा उंचवू शकतात. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी स्पर्धेची पूर्ण माहिती दिली.

या स्पर्धेत, महिलांच्या स्पर्धेतील विजेत्या प्रथम संघास ७५०००/- रुपये रोख व करंडक, द्वितीय संघास ५००००/- रुपये रोख व करंडक, तृतीय संघास २५०००/- रुपये रोख व करंडक तसेच उत्कृष्ट फलंदाज रुपये ५०००/- रोख व करंडक, उत्कृष्ट गोलंदाज रुपये ५०००/- रोख व करंडक, उत्कृष्ट अष्टपैलू रुपये ७०००/- व करंडक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपये ५०००/- व करंडक याशिवाय प्रत्येक सामन्यास प्लेयर ऑफ द मॅच व फाइटर ऑफ द मॅच ही वैयक्तिक पारितोषक देऊन सन्मानित करण्यात येईल.
पुरुषच्या स्पर्धतील प्रथम पारितोषिक विजेत्या संघास १५००००/- रुपये रोख व करंडक, द्वितीय संघास १०००००/- रुपये रोख व करंडक तसेच तृतीय संघास ७५०००/- रुपये रोख व करंडक तसेच उत्कृष्ट फलंदाज रुपये १००००/- रोख व करंडक, उत्कृष्ट गोलंदाज रुपये १००००/- रोख व करंडक, उत्कृष्ट अष्टपैलू रुपये ११०००/- व करंडक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपये १००००/- व करंडक याशिवाय प्रत्येक सामन्यास प्लेयर ऑफ द मॅच व फाइटर ऑफ द मॅच ही वैयक्तिक पारितोषके देण्यात येतील.

यावेळी टी-२० प्रीमियर लीग (पर्व-२) नोंदणी केलेल्या एकूण ७८ महिला खेळाडू व २०३ पुरुष खेळाडू यांचे लिलाव पद्धतीने निवड करण्यात आली. पुरुष संघासाठी आठ संघमालक व संघाचे नावे पुढील प्रमाणे नरेंद्र चुरी (प्रतीक रॉयल्स), सुदाम मोरे (मोरे पाटील पॅकर्स), केतुल सोनिगरा (सोनीगरासुपर किंग्स), श्री आसवानी (आसवानी डेअर डेव्हिल्स), रवी शेट्टी (शेट्टीस बंटस वॉरियर्स), विश्वजीत बारणे (विश्वा टायगर्स ), प्रेम कोकणे (स्पोर्ट्स स्टोरीज अवेंजर्स), शिवांश मानकर (सह्याद्री किंग्स) व महिला संघासाठी चार संघ मालक व संघांची नावे पुढील प्रमाणे नरेंद्र अग्रवाल (ऐश्वर्याम चॅलेंजर्स), रवी शेट्टी (शेट्टीस बंटस वॉरियर्स), हर्ष नायर (नायर ईगलस्), जानवी धारिवाल बालन (ऑक्सीरीच) आहेत. यावेळी सर्व संघमालकांचा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जगदीश शेट्टी (अध्यक्ष), राजू कोतवाल (सचिव), डॉ दिलीपसिंह मोहिते (सहसचिव), संजय शिंदे (खजिनदार), हर्ष नायर, विजय कोतवाल, नरेंद्र कदम, मुकेश गुजराथी, प्रदीप वाघ, अरुण जागडे, प्रशांत तेलंगे, अमित कदम, डॉ मृदुला महाजन, सुशील जाधव, ऐश्वर्या साठे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group