पिंपरी (Pclive7.com):- संत तुकारामनगर पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे संत तुकारामनगर, सहकारनगर, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी, सांगवी, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

संतोष शिवराम घारे (वय ४४, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक संशयित पोलिसांना आढळून आला. शहर परिसर आणि मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी पाळत ठेवली होती.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, उपनिरीक्षक विनायक पाटील, दत्तू पाटेकर, अनिल मोहिते, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, जावेद मुजावर, संतोष रजपूत, सुनील धावारे यांच्या पथकाने कामगिरी केली.



















Join Our Whatsapp Group