
निगडी (Pclive7.com):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निगडी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मोठ्या प्रमाणात महिला, युवक तसेच नागरिकांनी उपस्थित राहून बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात महिलांचा विशेष सहभाग पाहायला मिळाला. उपस्थित महिलांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समता, शिक्षण आणि मानवमुक्तीचा संदेश दिला.

यावेळी पल्लवी आंबोरे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना महिला वर्गासह संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिक्षण, समान हक्क, स्वाभिमान आणि न्यायासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. जयंती उत्सवानिमित्त परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी घोषणाबाजी करत बाबासाहेबांच्या विचारांना सलाम केला. युवकांनी शिस्तबद्ध आयोजन करत कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमात पल्लवी आंबोरे, मीना लोखंडे, रीना साळुंखे, शारदा साळुंखे, नंदा तरकसे, अलका रामटेके, मालती आंबोरे, कल्पना वाघमारे, संगीता शिंदे, वैशाली सोनवणे, पुष्पा किरवले, भारती जोगदंड तसेच डी. एस. आंबोरे, युवा नेते नारायण लोखंडे, दिपक खैरनार, विष्णू लोखंडे, रमेश शिरसाठ, विक्रांत वाघमारे, स्वप्निल प्रधान, भारत तरकसे, करण वाघमारे, विघ्नेश जोगदंड, सुमित आंबोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला.




















Join Our Whatsapp Group