पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ भोसरी विधानसभेचे आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, रविवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती संयोजक राजन लोणकर यांनी पत्रकाद्वारे दिली.


‘देव, देश आणि धर्मा’साठीच्या कार्याची दखल
पुरस्काराची घोषणा करताना संयोजकांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्याच्या विविध विषयांवरील दौरे आता संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. विविध हिंदू संमेलनांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या याच ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीवरील अखंड कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group